नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदव्युत्तर पदवी वैदयकीय महाविदयालयाला परवानी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 सप्टेंबर 2024

 नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science)’ सुरु करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग अर्थात National Medical Commission मार्फत परवानगी प्राप्त झालेली आहे. यामुळे नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे महानगरपालिकेस शक्य होणार असून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले आहे.

हे  वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

महानगरपालिकेचे पदव्युत्तर वैदयकीय महाविदयालय सुरु करण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य शासनामार्फत आवश्यक परवानगी प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व त्यांनी संबंधित विभागांस जलद कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही आवश्यक परवानगी प्राप्त व्हावी यादृष्टीने सहकार्य लाभले. तसेच विधानसभा सदस्य आ.गणेश नाईक व विधानसभा सदस्य आ.मंदाताई म्हात्रे यांनीही यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

हे वाचा : पनवेल आणि मडगाव दरम्यान २ अतिरिक्त गणपती उत्सव विशेष

राज्य शासनामार्फत आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोकसभा सदस्य खा. नरेश म्हस्के यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री प्रतापराव जाधव व केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याकडे परवानगी मिळण्याबाबत पत्रव्यवहार करुन व प्रत्यक्ष भेटून सातत्याने पाठपुरावा केला. याचा सकारात्मक परिणाम होत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची नवी मुंबई महानगरपालिका पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय (Post Graduate Institute of Medical Science) सुरु करण्यास परवानगी प्राप्त झाली  आहे. ही नवी मुंबईकरांना गणेशोत्सवात मिळालेली मौल्यवान आरोग्यपूर्ण भेट आहे.

हे वाचा : तिचा लढा… !

सदर मंजूरीनुसार पीजी मेडीकल सायन्स इन्स्टिटयुटमध्ये पहिल्या टप्प्यात ‘मेडिसीन (3 सीट्स)’, ‘ऑर्थोपॅडीक (2 सीट्स)’, ‘गायनॅकोलॉजी (8 सीट्स)’ व ‘पिडीयाट्रीक (4 सीट्स)’ अशा 4 शाखा सुरु कऱण्यात येत असून लवकरच ‘सर्जरी’ याही शाखेला परवानगी प्राप्त होणार आहे.

हे वाचा : कोकणचे वायनाड व्हायला नको !

मेडीकल सायन्स इन्स्टिटयुट सुरु करण्यासाठी महानगरपालिकेच्या वाशी व नेरुळ सार्वजनिक रुग्णालयात सर्व आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीन, प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व आवश्यक कर्मचारीवर्ग उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात लवकरच महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.

हे वाचा :  इमारतींची पडझड आणि उदासिनता

या पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (Post Graduate Institute of Medical Science) प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टर पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी येतील व नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील रुग्णांवरील उपचारांसाठी या प्रशिक्षित डॉक्टर्सचा उपयोग होईल.

हे वाचा :  शिक्षणाचे वास्तव

याव्दारे महापालिका रूग्णालयात मेडिकल इन्टेसिव्ह केअर, पिडीयाट्रीक इन्टेसिव्ह केअर, इमर्जन्सी ॲण्ड ट्रॉमा सर्व्हिसेस अशा सुपर स्पेशालिटी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महानगरपालिकेच्या आऱोग्य विभागाचे सक्षमीकरण होणार असून नवी मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका रुग्णालयात अधिक उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

========================================================


========================================================

=======================================================