गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ) सोबत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) चा सामंजस्य करार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 1 सप्टेंबर 2024

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ) सोबत ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) चा सामंजस्य करार नुकताच TSSIA हाउस, ठाणे येथे औपचारिकरित्या करण्यात आला.

या सामंजस्य करारावर ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (TSSIA) च्या अध्यक्षा सुजाता सोपारकर आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस जेम GeM चे मुख्य अधिकारी स्टेट्  ए.व्ही. मुरलीधरन यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या कार्यक्रमाला  विजू सिरसाट, सहसंचालक ,उद्योग संचालनालय (कोकण विभाग ), सीमा पवार उपसंचालक, निनाद जयवंत ,चेअरमन टिसा भिवंडी चॅप्टर बारी व जे व्ही कुलकर्णी कार्यकारी समिती सदस्य उपस्थित होते.

हे वाचा :  तिचा लढा… !

या कराराचा उद्देश सार्वजनिक खरेदी पद्धती सुधारणे आणि सरकारी खरेदी प्रक्रियेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSME) सहभाग वाढवणे हा आहे. ह्या सामंजस्य करारामुळे जिल्हातील व एमएमआर परिसरातील सर्व एमएसएमई च्या सरकारी खरेदीमध्ये सहभागास चालना मिळेल ह्या करारामागील उद्देश असा कि सार्वजनिक खरेदी पद्धती सुधारणे आणि सरकारी खरेदी प्रक्रियेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा (MSME) सहभाग वाढवणे हा होय .

हे वाचा : इमारतींची पडझड आणि उदासिनता

GeM हे एक राष्ट्रीय खरेदी आणि विक्री साठी तयार केलेले पोर्टल आहे जे केंद्र आणि राज्य सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (पीएसयू) आणि ऑटोनॉमस संस्थांद्वारे वस्तू आणि सेवांचे खरेदीची व्यवस्था सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्यामुळे खरेदीमध्ये सर्वसमावेशकता पारदर्शकता,कार्यक्षमता तसेच एमएसएमईला आधार देणे हा ह्यामागील हेतू आहे. ह्या सामंजस्य करारामुळे एमएसएमई च्या अडचणींचे निराकरण होईल तसेच ह्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमित बैठका घेण्यात येणार  आहेत.

हे वाचा : कोकणचे वायनाड व्हायला नको !

========================================================


======================================================