अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी लागणारी प्रेरणा आहे- शिवसेना उपनेते-विजय नाहटा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  26 ऑगस्ट 2024

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी लागणारी प्रेरणा आहे. त्यांच्या  प्रेरनेनुसारच आज समाज प्रगती पथावर आहे, असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी केले.

 हे वाचा : स्वयंघोषित शिल्पकाराने नवी मुंबईला लुटून खाल्ले- नाना पटोले

जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्ट,सिवूड आणि मागास स्वर्गीय संस्था या संस्थेच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच युवा मातंग प्रतिष्ठान,हनुमान नगर तुर्भे या संस्थेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेच्या वतीने विजय नाहटा यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

हे वाचा : नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर

तुर्भे येथील हनुमान नगर येथे अतिशय आनंदी वातावरण आणि उत्साहात आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.

विजय नाहटा  मिरवणुकीतही सहभागी झाले होते. जयमल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त जेष्ठ नागरिकांना छत्री तसेच विद्यार्थ्यांना विजय नाहटा यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विजय नाहटा यांच्या समवेत शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

=======================================================


========================================================

========================================================