लाडक्या बहिणींकडून शिवसेना नेते विजय नाहटा यांना राखी बांधून रक्षा बंधन साजरे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 ऑगस्ट 2024

राखी पौर्णिमेच्या शुभदिनी सानपाडा आणि नेरुळ येथील शाखेतील महिला पदाधिकारी यांनी लाडका भाऊ म्हणून शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना राखी बांधून राखी पौर्णिमा सण साजरा केला. सानपाडा येथील सेक्टर सात येथील चौकात शिवसेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेच्या सणाचे आयोजन केले होते. तेथे शिवसेना महिला शहर संघटिका सुरेख गव्हाणे यांनी रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना शेकडो महिला पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधून राखी बंधन सण साजरा केला.


नेरुळ सेक्टर आकार पंधरा शाखेत उपजिल्हा प्रमुख संजय भोसले ,शहर प्रमुख विजय माने यांनी रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणीही शिवसेना उपनेते विजय नाहटा यांना शेकडो महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून रक्षा बंधन सण साजरा केला. यावेळी आयुष्यभर लाडक्या बहिणींच्या पाठीमागे हा भाऊ खंबीरपणे उभा असेल असे अभिवचन विजय नाहटा यांनी आपल्या लाडक्या बांहिणींना दिले तसेच ज्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे अशा बहिणींचे अभिनंदन केले व ज्या बहिणींच्या खात्यावर आजून रक्कम आली नाही त्यांच्याही रक्कम येणार आहे असे सांगितले.

ये वाचा :  तिचा लढा… !

आपले सरकार जे बोलते ते करून दाखवते. दिवाळीतही मागच्या वर्षा प्रमाणे सरकारच्या वतीने फराळाचे साहित्य येणार असल्याचे विजय नाहटा यांनी सांगितले. महाराष्ट्राला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि नवी मुंबईला विजय नाहटा यांच्या सारखे भाऊ लाभल्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला.यावेळी लाडक्या बहिणींचे विजय नाहटा यांनी आभार व्यक्त केले. यावेळी शहर प्रमुख विजय माने, उपजिल्हा दिलीप घिडेकर, प्रमुख संजय भोसले, अरुण गुरव,सुनिक गावस्कर कामगार सेनेचे प्रमुख प्रदिप बी.वाघमारे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

========================================================


========================================================