मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीणः नवी मुंबईत ४६हजार ६२९ अर्ज दाखल

अर्ज छाननी प्रक्रियेला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात वॉर रुमव्दारे गती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1ऑगस्ट 2024

 महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ४६ हजार ६२९ अर्ज दाखल झाले आहेत. प्राप्त अर्जांची पडताळणी सुरु करण्यात आलेली आहे.  या अनुषंगाने पोर्टलवरील महिला लाभार्थ्यांच्या प्राप्त अर्जांची जलद गतीने छाननी करुन त्यांना योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नमुंमपा मुख्यालयामध्ये दोन वॉर रूम स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

Edit : इमारतींची पडझड आणि उदासिनता

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व समाज विकास विभागाचे उपआयुक्त तथा योजनेचे नोडल अधिकारी किसनराव पलांडे व सहा. नोडल अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्यासह भेट देत कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली व कामाला नियोजनबध्द गती देण्याचे निर्देशित केले.

31 जुलै, 2024 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने 111 प्रभागांमध्ये स्थापन केलेल्या अंगणवाडी केंद्रासह एकुण 329 ठिकाणांहून ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन 27,046 व ऑफलाईन 21,583 असे एकूण 46,629 अर्ज प्राप्त झालेले आहेत.

Ganpati Special : गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेच्या कोकण रेल्वे मार्गावर २०२ विशेष गाड्या

सदर प्राप्त अर्जांची पडताळणी वार्डस्तरीय समितीमार्फत करण्यात येत आहे. या संदर्भात आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार उपआयुक्त, समाजविकास किसनराव पलांडे यांनी सर्व विभागांचे सहा. आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेऊन तांत्रिक अडचणींबाबतच्या शंकांचे निरसन केले आहे व सर्व विभाग अधिकारी यांनी जास्तीत जास्त ऑनलाईन अर्जांची छाननी करावी असे निर्देशित केले आहे.

प्राप्त अर्जांची छाननी आणखी जलद गतीने व्हावी याकरिता आयुक्तांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये 2 ठिकाणी वॉर रुमची स्थापना करण्यात आलेली असून 40 कर्मचा-यांची 2 सत्रात नेमणूक करण्यात आलेली आहे. याकरिता सकाळी 8 ते दुपारी 3 तसेच दुपारी 3 ते रात्री 10 अशा 2 सत्रात छाननीचे काम सुरू करण्यात आलेले आहे.

ज्या पात्र महिलांनी अद्याप अर्ज दाखल केलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून दरमहिना रू. 1500/- मात्र इतक्या रक्कमेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. 

========================================================

========================================================