आजही मुसळधार पावसाचा इशारा, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २२ जुलै २०२४

कालपासून कोसणाऱ्या मुसळधार पावसाने रात्रीच्या वेळेस काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मुंबई,ठाण्यासह कोकण किनारपट्टीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की, आज दिनांक 22 /7/24 रोजी दुपारी बारापासून High tide alert दिल्यामुळे ज्या शाळेच्या भागात पाणी भरून विद्यार्थ्यांना येण्या – जाण्याची अडचण होऊ शकते, फक्त अशाच शाळांनी सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना अकरा वाजता शाळेतून सोडण्यात यावे. दुपार सत्रातील अशा ठिकाणच्या शाळांना सुट्टी देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी, असे महापालिकेने कळविले आहे.

22 जुलै रोजी दुपारी 12.50 वा. 5 मीटरपेक्षा जास्त उधाण भरती असल्याने व आपले नवी मुंबई शहर समुद्रसपाटीपासून खालच्या भागात असल्याने शहरातील काही सखल भागात  पाणी साचण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी सतर्क राहून आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या‌ वतीने करण्यात येत आहे.


दरम्यान, हवामान विभागाने पालघर वगळता मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. याशिवाय नागपूर, गोंदीया, गडचिरोली जिल्ह्यांतही ऑरेंज अलर्ट असून भंडारा जिल्ह्यात रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

Edit : सोशल मिडियाचे मायाजाल

======================================================

========================================================