ट्रान्सफॉर्मच्या आगीत ५ गाड्या जळाल्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 जुलै 2024

नवी मुंबईत सध्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून ऐरोली येथे इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मरला आग लागून पाच  वाहने जळाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास माहिती मिळताच ऐरोली अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

News Update : आजही मुसळधार पावसाचा इशारा, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट

ऐरोली सेक्टर 3 मच्छी मार्केट येथे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी  फायर इंजिनच्या हाय प्रेशर च्या साह्याने पाणी मारून आग विझवली . शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  या  आगीमध्ये (१) रिक्षा MH 43 VR 3634 (2) जुपिटर MH43 CF 5817 (3). मोटर सायकल MH 43 CD 3419 (४) रिक्षा MH 43 BF 3764 (5) MH 43 AU 650 या गाड्यांना  आग लागून नुकसान झाल्याची माहिती ऐरोली अग्निशमन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Edit : सोशल मिडियाचे मायाजाल

========================================================


========================================================