माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंतीदिनी नमुंमपा मुख्यालयात अभिवादन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 1 जुलै 2024

हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे जनक, नामांकित कृषीतज्ज्ञ, महाराष्ट्र राज्याचे 12 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.

याप्रसंगी उपआयुक्त किसनराव पलांडे, प्रशासकीय अधिकारी  उत्तम खरात, विलास मलुष्टे, रवी जाधव, संजीव पवार आणि इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

=======================================================


=======================================================