नवी मुंबईतही नवीन तीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू -पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई, 1 जुलै 2024

देशभरात आजपासून तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाली. सात वर्षांवरील गुन्ह्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ असलेली फॉरेन्सिक सायन्स लेबॉरटरी (एफएसएल) ची व्हॅन नवी मुंबईत दोन ठिकाणी सुसज्ज आहेत. या व्हॅन त्या ठिकाणी भेट देवून तांत्रिक पध्दतीने काम करणार आहेत. अशाप्रकारे महाराष्ट्र राज्यात नागपूर आणि नवी मुंबईत मॉडेल शोध पद्धत अंमलात आणण्यात येत आहे. हे दोन्ही आयुक्तालय महाराष्ट्र डीजीपींनी मॉडेल म्हणून घेतले असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Crime News : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

नवीन तीन कायद्याबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या तीन कायद्यांमधील कलमांमध्ये शिक्षा, द्रव्यदंड या बद्दलच्या बदलांबाबत जनजागृती नवी मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात येत अहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या पातळीवर जनजागृती करण्यात येणार आहे.

Crime News : घराच्या अमिषाने महिलेची १५ लाखांना फसवणूक

या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी लागणा-या प्रशिक्षित पोलीस दलाची संख्या नेल्सन प्रणालीच्या माध्यामातून वाढविली आहे. तसंच संबंधित कर्मचाऱ्यांना.या तीन कायद्यांचे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या  कायद्यात महत्वाचं असलेलं डिजिटल पुरावे गोळा करणे, घटनास्थळी पुरावे गोळा करताना इन कॅमेरा रेकॉर्डिंग करणे हे नवी मुंबई पोलिसांच्या यथार्थ प्रणालीच्या माध्यामातून केलं जात आहे. तसंच ई समन्स पाठवण्याचं प्रावधान या कायद्यात करण्यात आलं आहे. तसंच फॉरेन्सिक साठी दोन कार नवी मुंबईत सुसज्ज असल्याचं आयुक्त भारंबे यावेळी म्हणाले.

========================================================

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म

========================================================


========================================================