- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- रत्नागिरी, 14 जून 2024
मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड आज संध्याकाळी बाजूला करण्यात यश आले आहे. आता या मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा हा महत्त्वाचा घाटरस्ता आहे. सततच्या पावसामुळे 13 जूनला संध्याकाळी घाटात मोठी दरड कोसळली होती. रस्त्याच्या मधोमध ही मोठी दरड कोसळल्याने कोल्हापूर आणि रत्नागिरीला जाणारी येणारी वाहतूक बंद झाली होती. काल रात्रीपासूनच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने, जिल्हा प्रशासनाने या मार्गावरील दरड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
दुपारनंतर या मार्गावर दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती. युद्धपातळीवर काम करून अखेर आज संध्याकाळी सात नंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.
दरम्यान अणुस्कुरा घाटात दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या घाटाला संरक्षक जाळी बसविण्यात यावी किंवा सुरक्षेच्या इतर उपयोजना करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
========================================================
========================================================
;