नवी मुंबई शहरातील सर्व होर्डींगचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा -रविंद्र सावंत

विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी काँग्रेसचा पाठपुरावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14  मे 2024

नवी मुंबई शहरातील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन विनापरवानगी बेकायदेशीरपणे होर्डींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्वयाची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.


पावसाळा आता अवघ्या काही दिवसावर आलेला आहे. पावसापूर्वी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा हे ओघाने आलेच. सोमवारी, दि. 13 मे रोजी वादळी वारे आनि अवकाळीमुळे मुंबई शहरात होर्डींगमुळे झालेल्या अपघाताच्या घटनेने अंगावर शहारे येत आहेत.

नवी मुंबई शहरामध्ये दिघा ते बेलापुरदरम्यान मोठ्या प्रमाणावर होर्डींग लागलेले आहेत. वाशी टोलनाक्यापासून बेलापुरमधील हायवेरवरील वाहतुक पोलीस चौकीपर्यंतच्या सायन-पनवेल महामार्गावर, नवी मुंबईतील रेल्वे स्थानकासमोरील परिसर, शहरातील उड्डाणपुल, पामबीच मार्ग, ठाणे-बेलापुर मार्ग, शहरातील अंर्तगत व बाह्य मार्ग, वर्दळीचे परिसर, चौक व उद्यान तसेच क्रिडागणे व अन्य सार्वजनिक ठिकाणी, शहरातील मुख्य विभागातील गृहनिर्माण सोसायटीचे आवार, गच्चीवरील परिसर या ठिकाणी हे होर्डींग लागलेले असतात.

NEWS : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

मुळातच यातील किती अधिकृत आहेत, हेच प्रश्नचिन्ह आहे. या अनधिकृत होर्डींगमुळे पालिका प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूलही बुडत आहे.

मुंबईत काल घडलेल्या घटनेमुळे नवी मुंबईतील होर्डीगच्या सुरक्षेचा प्र्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळापूर्व वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे या होर्डींगमुळे नवी मुंबईतही गंभीर घटना घडण्याची भीती आहे. शहरात असणाऱ्या सर्वच होर्डींगचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व विनापरवानगी लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डीग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केली आहे.

NEWS : वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य

========================================================


=======================================================