नवी मुंबईतील ७५ होर्डींग्जना नोटीस

स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे  संबंधित  होर्डींग्ज कंपन्यांना आदेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 मे 2024

घाटकोपर येथे सोमवारी मोठाले होर्डींग कोसळून झालेल्या भिषण दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेनेही धडक कारवाई सुरु केली आहे. शहरातील खासगी ठिकाणी उभारण्यात आलेल्या ७५ होर्डींग्जचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश नवी मुंबई महापालिकेने  होर्डींगधारक कंपन्यांना  दिले आहेत.

सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरात एक मोठाले होर्डींग कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ७५ अधिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर उंच उंच होर्डींग्जची मजबुती आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

NEWS : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

मुंबईतील घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून शहरातील परिस्थितीची माहिती घेतली तसेच २४ तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

NEWS : वादळी वारे व अवकाळी पर्जन्यवृष्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य

दरम्यान, नवी मुंबई महापालिका हद्दीत असंख्य ठिकाणी विविध जाहिरात कंपन्याकडून मोठमोठी होर्डीग्ज उभाऱण्यात आली आहेत. शहरात साधारण २०० च्या आसपास परवाधानारक मोठाले होर्डींग्ज, युनिपोल आदी उभारेले आहेत. त्यापैकी खासगी ठिकाणी उभारलेल्या ७५ होर्डींग्ज धारकांना ३० एप्रिल रोजीच नवी मुंबई महापालिकेतर्फे नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या होर्डीग्ज धारकांनी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र तातडीने सादर करायचे आहे. अन्यथा या सर्व होर्डींग्जधारकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती समाजविकास शाखेचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी दिली.

NEWS: नवी मुंबई शहरातील सर्व होर्डींगचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करा -रविंद्र सावंत

========================================================


========================================================