नवी मुंबई महानगरपालिकेचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 13 मे 2024
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळच्या सुमारास वादळी जोरदार गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. आज संध्याकाळी चार वाजल्यापासून जोरदार वारा सुरू झाला. या वा-यासोबत मोठ्या प्रमाणात धूळही वाहू लागली. या सोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली.
Navi Mumbai News :नवी मुंबईतील नालेसफाईची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्याकडून पाहणी
दरम्यान शहरात विविध ठिकाणी 15 झाडं कोसळली आहेत. तर ऐरोली इथल्या महावितरणच्या विद्युत वाहिनी मध्ये ठिणगी उडाली होती. यामुळे काही काळासाठी ऐरोली, खारघर परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ झाली.
दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कृपया नागरिकांनी शक्यतो आहे त्याच ठिकाणी थांबावे, प्रवास करणे टाळावे आणि मदतीची गरज भासल्यास नवी मुंबई महानगरपालिका तात्काळ कृती केंद्र यांच्याशी 1800222309 / 222310 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा जेणेकरून तात्काळ मदत उपलब्ध करून देणे शक्य होईल, असे स्पष्ट केले.
नवी मुंबई महानगरपालिका
आपत्ती व्यवस्थापन विभाग
तात्काळ कृती केंद्र क्रमांक
022-27567060
022-27567061
========================================================
========================================================