शिवसेना नेते विजय नाहटा यांचा कार्यकर्त्यांशी संवाद
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 12 मे 2024
ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारानिमित्त सीवूड सेक्टर ४८ मध्ये मिसळ पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महायुतीतर्फे शिवसेना नेते विजय नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव भगत, शिवसेनेचे दिलीप घोडेकर, विजय माने, शिवसेना कामगार नेते प्रदीप वाघमारे, भाजपचे दत्ता घंगाळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते विजय नाहटा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा नवी मुंबईत जोरदार प्रचार करण्यात येत आहे. शिवसेना नेते विजय नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विधानसभा मतदार संघात विभागवार प्रचार करीत जनतेशी संवाद साधला जात आहे. याचाच एक भाग म्हणून सीवूड सेक्टर ४८ येथील शनी मंदीरात मिसळ पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना शिवसेना नेते विजय नाहटा यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात जनतेसाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले गेले आहेत. तेे काम अभूतपूर्व आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सामान्य जनतेच्या हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या लोकहिताच्या कामामुळेच मतदार योग्य तो निर्णय घेतील आणि ठाणे लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आपला कौल देतील, असा विश्वास व्यक्त केला.
========================================================
========================================================