मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाईंदर, मावळमध्ये प्रचार रॅली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मावळ, 12 मे 2024

मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शनिवारी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. संध्याकाळी ठाणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथून सुरु झालेल्या प्रचार रॅलीला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यात ४५ हून अधिक उमेदवार विजयी होतील  असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केला.

महिलांनी सकाळी लवकर मतदान करावे. त्यानंतर घरातील इतर लोकांनी मतदानासाठी जायचे आहे. नवीन संसद भवनामध्ये पहिला निर्णय महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. एक एक मत महत्वाचे आहे. एक मत देश घडविणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांकडे झेंडा नाही आणि अजेंडा देखील नाही. विरोधक सैरभर झाले असून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडून संविधान बदलणार असे बिनबुडाचे आरोप केले जातात. पण जोवर चंद्र सुर्य आहे तोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कायम राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकारने देखील अनेक विकास कामे केली आहेत. त्या विकासकामांच्या जोरावरच जनता मत देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

========================================================


========================================================