- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 10मे 2024
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ६ मे रोजी अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून कोटे डी’आयव्होर या देशाच्या एका नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून १५ कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त केले आहे.
या प्रवाशाने भारतात तस्करी करण्यासाठी अंमली पदार्थ असलेल्या कॅप्सूलचे सेवन केल्याची आणि त्या शरीरातून आणल्याची कबुली दिली. या प्रवाशाला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मुंबईतील सर जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रूग्णालयात दाखल केल्यानंतर 6 ते 8 मे या काळात या प्रवाशाच्या पोटातून 1468 ग्रॅम कोकेन असलेल्या एकूण 77 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या. या कोकेन साठ्याची अवैध बाजारातील किंमत सुमारे 15 कोटी रुपये इतकी आहे.या प्रवाशाला अटक करून पुढील तपास सुरु असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.
========================================================
========================================================