कळंबोलीत 4 किलो गांजा जप्त, १ अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24  एप्रिल 2024

नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र केली असून कळंबोली येते अमली पदार्थ विकणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ किलो १०० ग्रॅम इतका गांजा जप्त केला आहे. या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAD STORY : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनयपुरे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आय़ुक्त, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १६ एप्रिल रोजी कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षिरसागर यांना मिळाली होती.

LEAD STORY : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, उपनिरीक्षक कुलदिप मोरे, हवालदार बनवकर, रमेश तायडे, अंकुश म्हात्रे, अनंत सोनकुळ यांच्या पथकाने कळंबोल नाका, स्टीलमार्केट परिसरात सापळा रचला.

मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात संशयास्पदरितीने वावरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे १ लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचा ४ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांज्याचा साठा आढळून आला.

याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. 123/2024 गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (II) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

========================================================


========================================================


========================================================