एलआयसीच्या इमारतींमधील रहिवाशांना दिलासा; पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे एलआयसीला निर्देश
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,  14 मार्च 2024

मुंबईत एलआयसीच्या ६८ इमारती असून त्या मोडकळीस आल्याने पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. यासंदर्भात सदनिका धारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, केंद्रीय वित्त मंत्री यांची सदनिका धारकांच्या शिष्टमंडळासह भेट घेण्यात येऊन प्रचलित कायद्यात दुरूस्ती सुचविणारा प्रस्ताव सादर करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व सदनिका धारकांना ७९ अ नंतर ७९ ब, ७९ क ची नोटीस प्राप्त व्हावी आणि पुनर्विकासाची कार्याला गती मिळावी, यादृष्टीने म्हाडाने तातडीने पावले उचलावीत, सदनिका धारकांशी एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी नम्रतापूर्वक व्यवहार करावा, सदनिका खाली करण्याची कार्यवाही सध्या थांबवावी, अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिल्या.

बातमी वाचा : महामार्गवरील, तीर्थक्षेत्रमधील तसेच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था कराव्यात– निलम गोऱ्हे

एलआयसी इमारती मधील सदनिका धारक सध्या अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. ८० ते १०० वर्षापेक्षा जुन्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, धोकादायक झाल्या आहेत, पावसाळ्यात सदनिकांचे छप्पर कोसळून अनेक दूर्घटना घडल्या आहेत. ७९ अ नोटीस प्राप्त होऊन ६ महिने पूर्ण झाल्याने आता ७९ ब, ७९ क अनुसार सर्व सदनिका धारकांना पुनर्विकासाचा हक्क मिळावा, एलआयसीकडून सदनिका धारकांची होत असलेली हेळसांड थांबावी या मागण्यांसाठी एलआयसी टेनंटस् ॲण्ड ऑक्युपंटस् वेल्‍फेअर असोसिएशन (एलटीओडब्लूए) यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.


त्यानंतर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी एलआयसीचे संबंधीत अधिकारी मिता खरे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मिलिंद शंभरकर आणि असोसिएशनचे अध्यक्ष  रमेश निर्मल जैन, महासचिव  मुकेश शहा,  भूपेंद्र पवार आणि  संकेत सातर्डेकर यांची उच्चस्तरीय बैठक विधान भवन, मुंबई येथे घेऊन सदनिका धारकांना दिलासा मिळावा यादृष्टीने एलआयसी आणि म्हाडा यांना वरीलप्रमाणे स्पष्ट सूचना दिल्या.


या बैठकीत एलआयसी इमारतींमधील सुमारे ५०० सदनिका धारकांनी आपल्या व्यथेला साश्रु नयनांनी वाट मोकळी करून दिली. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एलआयसी इमारतींमधील सदनिका धारकांच्या व्यथा-वेदना मा. अध्यक्ष महोदयांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आमच्या पर्यंत पोहचल्या असून याबाबत १५ दिवसाच्या आत उचित कार्यवाही करून संबंधितांना दिलासा दिला जाईल, असे यावेळी जाहीर केले.

सदनिका धारकांशी एलआयसीच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी नोटीसांबाबतची कार्यवाही करताना नम्रतापूर्वक व्यवहार करावा, सदनिका खाली करण्याची कार्यवाही सध्या थांबवावी असे आदेश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी

========================================================


========================================================

========================================================