अंध मतदारांनी घेतला प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे , 4 मार्च 2024

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार २७ फेब्रुवारी रोजी जोशी बेडेकर कॉलेजमधील अंध विद्यार्थ्यांसाठी मतदानाचे प्रात्यक्षिक दाखविण्याकरिता जिल्हा निवडणूक कार्यालय ठाणे, १४८-ठाणे विधानसभा मतदारसंघ स्नेहांकित Helpline च्या अध्यक्षा प्रमिला भट, कार्यकर्ती  नूपूर जोशी व जोशी बेडेकर कॉलेजचे अतूल्य इनक्लूझिव सेल या स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमास जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या  सुचित्रा नाईक यांनी मोलाचे सहकार्य केले.

उपस्थित अंध मतदारांना Demo मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या EVM वर तहसिलदार  स्मिता मोहिते यांनी दिले. अंध मतदारांना प्रत्यक्ष मतदान कसे करायचे, याबाबत त्यांच्या मनामध्ये असलेल्या सर्व शंकाचे निरसन करण्यात आले. त्याकरिता डमी मतदान केंद्र तयार करणे, डमी ब्रेललिपी मतपत्रिका तयार करून, मतदान केल्यानंतर मार्कर पेनाने त्यांच्या बोटावर शाई लावण्यात आली.


याबाबत अंध मतदारांनी प्रशिक्षण दिल्याबाबत व निवडणुकीमध्ये मतदान करता येणार असल्याबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.

========================================================


========================================================

========================================================