सिडको गृहनिर्माण योजनेतील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 फेब्रुवारी 2024

सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 मधील सदनिकांकरिता अर्ज करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अल्प उत्पन्न गट/सर्वसाधारण गटातील अर्जदारांकरिता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडकोतर्फे कळविण्यात येत आहे.

सिडकोच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या सदर योजनेच्या माहितीपुस्तिकेत अनावधानाने (चुकून) अल्प उत्पन्न गट/ सर्वसाधारण गटासाठी  महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही असे छापले गेले आहे.

बातमी वाचा : सिडकोच्या तळोजा, द्रोणागिरीतील घरांच्या बुकींसाठी किओक्स काउंटर

सिडको महामंडळाने आजतागयत विविध गृहनिर्माण योजना सादर केल्या आहेत. या सर्व योजनांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)/अल्प उत्पन्न गट/सर्वसाधारण गट (LIG/GP) या घटकांसाठी महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची अट ठेवण्यात आली आहे.


संचालक मंडळाच्या निर्णयानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अल्प उत्पन्न गट/ सर्वसाधारण गट  या घटकांसाठी 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते.  तथापि, सिडकोच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या सदर योजनेच्या माहितीपुस्तिकेत अनावधानाने अल्प उत्पन्न गट/ सर्वसाधारण गटासाठी  महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, असे टंकलिखित झाले आहे. मात्र ही बाब अनावधनाने झाली असून महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 करीता अर्ज करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अल्प उत्पन्न गट/सर्वसाधारण गटातील सर्व अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्याचे सिडको प्रशासनाने जाहीर केले आहे.

========================================================


========================================================

========================================================