सिडकोच्या तळोजा, द्रोणागिरीतील घरांच्या बुकींसाठी किओक्स काउंटर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 फेब्रुवारी 2024 

सिडको महामंडळाने आपल्या  3,322 घरांच्या (सदनिका)  बुकिंगसाठी  तळोजा आणि द्रोणागिरी येथे सुसज्ज किओस्क बुकिंग काउंटर सुविधा  सुरु केली आहे. या बुकिंग काउंटरवर सिडकोच्या कर्मचाऱ्यांकडून सदनिकेची नोंदणी करण्यासाठी व योजनेबद्दलच्या अन्य बाबींसाठी अर्जदारांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सिडकोतर्फे 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर महागृहनिर्माण योजना जानेवारी 2024 चा प्रारंभ करण्यात आला होता. या गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील तळोजा आणि द्रोणागिरी नोडमध्ये एकूण 3,322 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण सदनिकांपैकी द्रोणागिरी नोड येथील 61 व तळोजा नोड येथील 251 याप्रमाणे 312 सदनिका या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध आहेत, तर द्रोणागिरी येथील 374 व तळोजा येथील 2,636 याप्रमाणे 3,010 सदनिका या सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. योजनेच्या ऑनलाइन नोंदणी व सविस्तर माहितीकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सिडको महागृहनिर्माण योजना जानेवारी – 2024 करीता अर्ज नोंदणी ते सोडती दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या सुलभ व पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून 26 जानेवारी 2024 रोजी ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. योजनेची संगणकीय सोडत 19 एप्रिल 2024 रोजी काढण्यात येणार आहे.


तरी अधिकाधिक नागरिकांनी या बुकिंग काउंटर सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

========================================================

========================================================

========================================================