१० वर्ष देशाला फसवणाऱ्या मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु, केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार: नाना पटोले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पुणे, 24 फेब्रुवारी 2024

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १० वर्षात देशाचे नुकसान केलेमोदींनी दिलेली गॅरंटी ही खोटी ठरली आहे. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या१५ लाख रुपयेमहागाई कमी करणार व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार यासारख्या अनेक गॅरंटी मोदींनी दिल्या पण त्यातील एकही पूर्ण केली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना ऐतिहासिक कर्जमाफी दिली परंतु यवतमाळच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी दिलेली कर्जमाफीची गॅरंटीही खोटी निघाली. मोदी सरकारने  शेतकरीतरुण महिला अशा सर्वांना फसवले असा आरोप करीत या फसवणाऱ्या सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले असून केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहेअसा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त  केला .


पुणे शहर व जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या महाविकास आघाडी इंडिया फ्रंटच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होतेते पुढे म्हणाले की२०२४ हे वर्ष अत्याचारी व्यवस्थेपासून मुक्ती देणारे ठरणार आहे. दक्षिण भारतातून भाजपाला दारे बंद झाली आहेतउत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले आहेत. बिहारमध्ये राजद पक्ष आधीपासूनच इंडिया आघाडीत आहे. महाराष्ट्रात संविधानाची मोडतोड करुन खोके सरकार आणले आहेहे जनतेला आवडलेला नाही. देशातील ही परिस्थिती पाहता नरेंद्र मोदींसाठी व भाजपासाठी सर्व दारे बंद झाली आहेत. पुण्यातूनही इंडिया आघाडीचाच खासदार निवडून येणार आहे असे पटोले म्हणाले.


पुणे हे विद्येचे माहेरघर आहेसांस्कृतीक वारसा लाभलेले शहर आहेया शहरात ड्रग्जचा काळा धंदा जोरात सुरु आहे. पुण्याची संस्कृती बिघडवण्याचे काम केले जात आहे. पुण्यालामहाराष्ट्राला ड्रग्जच्या विळख्यात अडकवू नका. पुण्यात विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत पण त्यांना आंदोलनाची परवानगी दिली जात नाही. ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही. या मुलांचा प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारला जाब विचारुअसेही नाना पटोले म्हणाले.  


या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारखासदार सुप्रिया सुळे. माजी मंत्री आ. डॉ. विश्वजित कदमअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेलखासदार चंद्रकांत हंडोरेखासदार वंदना चव्हाण,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार संजय जगतापशहर अध्यक्ष अरविंद शिंदेमाजी आमदार उल्हास पवारमाजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटीलमाजी मंत्री शिवसेनेचे नेते सचिन अहिरप्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,  प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशीमाजी मंत्री रमेश बागवेएनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेखआमदार रविंद्र धंगेकरप्रवक्तेमाजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह महाविकास आघाडीस सर्व घटक पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================


========================================================

========================================================