उलवे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि आम्ही उलवेकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उलवे, 21  फेब्रुवारी2024

आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि आम्ही उलवेकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन उलवे परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उलवे, उरण परिसरातील नागरिक मोठय़ा संख्यने उपस्थित होते.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, साई मंदीर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवी पाटील, माजी उपसरपंच सचिन घरत, सरपंच माई भोईर, भात गिरणी संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र घरत, सदस्य रोशन म्हात्रे, सदस्य हेमंत पाटील, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोटे, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन करण्याचे मंडळाचे हे ६ वे वर्ष आहे.यावेळी वेशभुषा आणि प्रश्न मंजुषा आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमधील तसेच स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देवून  सन्मानित करण्यात आले. शिवजयंती निमित्त उलवे परिसरातील सर्वात मोठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जवळपास ११०० रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतल्याची माहिती आम्ही उलवेकर मित्र मंडळाचे संस्थापक सचिन राजे येरुणकर यांनी दिली.


यावेळी रवी पाटील यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक सचिन राजे येरुणकर, संस्थेचे अध्यक्ष विनोद थोरात, महिला अध्यक्ष रचना सचिन येरुणकर, निलेश पाटील, नारायण मुरकर,रोहन खडूं, संदीप पाटील,रमेश खडूं,किशोर कदम, संदीप नलावडे, प्रदीप नलावडे, साई पैकडे, प्रथमेश पाष्टे, तनय मुरकर, वेद येरुणकर, कैलास डुकरे, अल्पेश गायकवाड, मधू, निशिगंधा शेलार, सविता दवे, नम्रता मुरकर, पूर्णिमा जोशी, कीर्ती फटाक, भावना तिवारी, सुजाता थोरात, अनुश्री घारे, प्रिया साळवे, सरिता साळवे,उषा डे, सोनाली ठाकूर, सारिका पैकडे, सिद्धी पैकडे, राणी सिंग,नयना पाटील,हर्षदा गायकवाड आदी मान्यवर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================

========================================================

=======================================================