राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडयाळ चिन्ह अजित पवारांना

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना धक्का

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष नेमका कोणाचा हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला होता. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे चिन्ह हे शरद पवार यांचे नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असल्याचा निकाल ६ फेब्रुवारी रोजी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयात पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे भाजपनेही स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, काँग्रेसने हा निर्णय अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी केंद्र सरकारव टीका केली आहे.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाची संपूर्ण प्रत 

NCP- party name and symbol dispute- ECI Final Order 06.02.2024

========================================================

========================================================