- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 13 डिसेंबर 2023
मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने 13 डिसेंबर रोजी तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अंमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (एनडीपीएस), नष्ट केले. नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (सीएचडब्लूटीएसडीएफ), एमडब्ल्यूएमएल येथे हे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.
अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम, मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र -I, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अंमली पदार्थ नष्ट समितीसमोर राबवण्यात आली. या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा 2 मार्च .2023 रोजी अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि 19 जुलै 2023 रोजी दुसऱ्यांदा अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किंमतीचे एकूण 244.905 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
========================================================
========================================================