- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 1 नोव्हेंबर 2023
‘नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा’ जल्लोषात संपन्न होत असून मागील वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने 35000 हून अधिक खेळाडू विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेले आहेत.यामधील जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा या डॉ. सी.व्ही.सामंत विद्यालय व डी.आर. पाटील प्राथमिक विद्यालय, तुर्भे येथील मैदानात उत्तम आयोजनात संपन्न झाल्या.
बातमी वाचा : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विकासकामे वेळेत पूर्ण करा
या स्पर्धेत 14,17 व 19 वर्षाआतील गटांमध्ये मुलांच्या 134 व मुलींच्या 88 इतक्या मोठ्या प्रमाणात संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा शुभारंभ शिक्षण संस्थेचे सचिव कमलाकर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी स्पर्धेत सहभागी संघांना शुभेच्छा देत अशा शासकीय स्पर्धा आयोजनासाठी संस्था नेहमीच तयार असेल असे सांगितले.
यावेळी क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, संस्थेचे सदस्य चंद्रकांत पाटील व ललीत म्हात्रे, मुख्याध्यापक कोळी, पर्यवेक्षक धनगर, उप मुख्याध्यापिका श्रीम. कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धा आयोजनासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक दुबल व इतर सहका-यांनी मोलाचे योगदान दिले.
बातमी वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
या स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम कबड्डीच्या सामन्यात डॉ. सामंत विद्यालय संघाने 22 गुण संपादन करीत 16 गुण मिळविणा-या हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, सानपाडा संघावर 06 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
14 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.31,कोपरखैरणे संघाने 19 गुण संपादन करीत 17 गुण मिळविणा-या रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघावर 06 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
बातमी वाचा : जबाबदारीने घ्या पर्यटनाचा आनंद
17 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 35 गुण संपादन करीत 23 गुण मिळविणा-या डॉ. सी.व्ही. सामंत विद्यालय तुर्भे संघावर 12 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
17 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 28 गुण संपादन करीत 25 गुण मिळविणा-या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.104,रबाले संघावर 03 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
बातमी वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी
19 वर्षाआतील मुलांच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 23 गुण संपादन करीत 08 गुण मिळविणा-या डॉ. सी.व्ही. सामंत विद्यालय तुर्भे संघावर 15 गुणांनी मात करून अंतिम विजय मिळवला.
19 वर्षाआतील मुलींच्या गटात झालेल्या अंतिम सामन्यात रा.फ.नाईक विद्यालय कोपरखैरणे संघाने 26 गुण संपादन करीत व 05 गुण मिळविणा-या के.बी.पी.कॉलेज,वाशी संघावर 21 गुणांनी मात करीत अंतिम विजय मिळवला.
या स्पर्धेत विजयी झालेल्या संघानी मुंबई विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून विजयी होत पुढील स्पर्धेकरिता पात्र झालेल्या संघांचे अभिनंदन करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पुढील उत्तम कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत.
========================================================
========================================================