जबाबदारीने घ्या पर्यटनाचा आनंद

  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 ऑक्टोबर 2023

भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये पर्यटन क्षेत्राला फार महत्व आहे. विशेषतः कोरोना महामारीचा मुकाबला केल्यानंतर तर पर्यटनाकडे नागरिकांचा ओघ सातत्याने वाढू लागला आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून थोड्याश्या निवांतपणासाठी, नाविण्याची ओढ, निसर्गात रमण्यासाठी लोक आता वेळ काढू लागले आहेत. पर्यटनाचा कालावधी हा एक दिवसाचा किंवा एक आठवड्याचाही असू शकतो. पुन्हा नव्या उर्जेने आणि स्फूर्तीने कामाला लागण्याचे बळ पर्यटन नक्कीच आपल्याला मिळवून देतो. त्यामुळे केवळ विरंगुळा म्हणूनच नव्हे तर नवं काही शिकवणारा आणि आपल्या जीवनाला नवी आशा देणारा पर्यटनच म्हणूनच आपल्यासाठी नेहमीच खास असतो.

बातमी वाचा : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विकासकामे वेळेत पूर्ण करा

येत्या काही दिवसांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागतील आणि पर्यटनाचा हंगाम सुरू होईल, हा अगदी पावसाळ्यापर्यंत सुरू राहील. या काळात नेहमीची पर्यटन स्थळे पाहण्यासोबतच ग्रामीण पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा वाढणार आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती पर्यटन मार्गदर्शनाची आणि पर्यटकांना वाजवी दरात पर्यटनाचा आनंद देण्याची. अनेकदा पर्यटनासाठी पॅकेज ठरवले जातात किंवा भरमसाठ दर आकारले जातात यावर आता नियंत्रण असण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यटन स्थळांवर चांगल्या स्थितीत असलेली शौचालये उभारण्याची गरज आहे.

बातमी वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

महामार्गावरून प्रवास करताना स्वच्छ टॉयलेट असा बोर्ड लावलेल्या ठिकाणीही टॉयलेट स्वच्छच असेल याची खात्री देता येत नाही. पर्यटकांना निसर्गसौंदर्यासोबतच स्वच्छ टॉयलेटचीही गरज असते याकडे आता स्थानिकांनी आणि स्थानिक प्रशासनानेही लक्ष देणे आवश्यक आहे. पर्यटनामुळे स्थानिक गाव किंवा तो प्रदेश नकाशावर ठळकपणे समोर येतो. अशावेळी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगल्या स्थितीतले रस्ते असणे फार आवश्यक आहे. रस्ते खराब असतील तर एकदा आलेला पर्यटन पुन्हा भेट देण्यासाठी फारसा उत्सुक राहत नाही. पर्यटनासोबच खाद्यसंस्कृतीही विकसीत होत असते. स्थानिक पदार्थांची चव चाखवण्यासोबतच स्थानिक नागरिक पर्यटकांना हवेसे सर्व पदार्श उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतात, अशावेळी मात्र संबंधित ठिकाणी भेट देताना तिथली खाद्यसंस्कृती, तिथे येणारी पीके आणि त्यांचा होणारा परिणाम याबाबत पर्यटकांनीही जागरूक राहणे गरजेचे आहे.

बातमी वाचा : माणसाला आपल्यातील ‘मी’ सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे : डॉ. आनंद नाडकर्णी

मुळातच एखाद्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपण त्या नैसर्गिक अधिवासात सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पर्यटक म्हणजे ज्याला त्या ठिकाणी भेट देवून जे जे उत्तम ते स्विकारता आले पाहिजे अशी व्यक्ती अशी व्याख्या आपण मानली तर कोणत्याही ठिकाणी आपल्यामुळे स्थानिकांना त्रास होणार नाही.

पर्यटन स्थळांवर पर्यटन येतात आणि प्रचंड कचरा करतात हे नेहमीच पाहिले जाते. यासाठी स्वयंशिस्त फार महत्वाची आहे. आपण पर्यटनाला जात आहोत तिथल्या निसर्गाशी एकरूप होण्यासाठी जात आहोत हे जोपर्यंत पर्यटक समजून घेत नाहीत तोपर्यंत ठिकठिकाणी खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिक दिसतच राहणार आहे.

बातमी वाचा :अंदमान समुद्रातील ज्वालामुखी आर्क ऑफ-निकोबारबाबत संशोधन

स्थानिकांनी आपल्यापरीने हा कचरा गोळा करण्याचा प्रयत्न केला तरी अनेक भागांमध्ये कच-याचे असे ढिग दिसून येतात. पर्यटनातून आपण नवी उर्जा मिळवत असतो मात्र ज्या ठिकाणी भेट देतो तिथे तर कच-याचे रिटर्न गिफ्ट तर देत नाही ना याचा विचार आता पर्यटक म्हणून घराबाहेर पडताना व्हायला हवा. अर्थातच त्यासाठी त्या ठिकाणी कच-याकुंड्याही पुरेश्या संख्येत असणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या ठिकाणी अशी कचराकुंडी नसेल तर आपण आपल्या सोबत एखादी पिशवी सोबत नेऊ शकतो ज्याच आपल्यामुळे होत असलेला कचरा गोळा करायचा आणि नंतर तो कचराकुंडीत टाकायचा. हे करणे तर सहजच शक्य आहे.

अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टिंसोबत पर्यटनाचा आनंद नेहमीच वाढता राहिल. पर्यटन हे देवाण- घेवाण यावर आधारित असल्याचे मान्य केले तरी पर्यटनाचा आनंद मनला नेहमीच ताजेपणा देत असतो.

========================================================

========================================================