Baba Maharaj Satarkar : कीर्तनकार आणि निरूपणकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

वारकरी संप्रदायावर शोककळा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 ऑक्टोबर 2023 :

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे आज पहाटे नेरूळ इथल्या राहत्या घरी वृध्दापकाळानं निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता नेरुळ(Nerul) इथल्या समशनभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबमहाराज सातारकर याचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातरकर असं होतं. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. 1962  साला पासून बाबामहाराजांनी कीर्तन आणि प्रवचन करण्यास सुरवात केली. घराची तीन पिढ्यांची किर्तन आणि प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे नेली. अध्यात्म आणि भागवत संप्रदायाचे विचार त्यांनी किर्तनाच्या माध्यमातून समाजमानात रूजवले. किर्तनातून समाजप्रबोधनासोबतच बाबामहाराजांनी सुमारे 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केलं. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली.
————————————————–

———