नैना क्षेत्रातील गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23  ऑक्टोबर 2023

 सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित अर्थात नैना क्षेत्रातील सर्वसमावेश गृहनिर्माण योजनेचा अधिकाधिक नागरीकांनी अर्ज करावेत याकरिता योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेकरिता संगणकीय सोडत २२ नोव्हेंबर २०२३ रोजी पार पडणार आहे.

बातमी वाचा : माणसाला आपल्यातील ‘मी’ सोबत अंतर्मुख आणि बहिर्मुख होता आले पाहिजे : डॉ. आनंद नाडकर्णी

नैना प्रकल्पाच्या मंजूर DCPR नुसार ४००० चौ. मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक  गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्या अनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% जागा ही आर्थिकदृष्टया दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाच्या सदनिकांसाठी खाजगी विकासकांमार्फत नैना प्रकल्प परिसरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर २०२३ रोजी एकूण १८१ सदनिकांची गृहनिर्माण योजना सादर करण्यात आली होती. यामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी १७ तर अल्प उत्पन्न गटासाठी १६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

बातमी वाचा : महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे परवडणारी घरे

सदनिकांकरिता पात्र उमेदवारांची सोडत पद्धतीने निवड करून पात्र उमेदवारांची यादी विकासकाला पाठविणे, एवढ्यापुरतीच सिडकोची भूमिका मर्यादित आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व अन्य प्रक्रियांकरिता https://lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बातमी वाचा : कॉंग्रेस प्रवक्त्यांकडून सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना चॉकलेटचा पुष्पगुष्छ भेट

ऑनलाइन अर्ज नोंदणीच्या अनुषंगाने अर्ज सादर करणे, शुल्क भरणा, प्रारुप यादी प्रसिद्ध करणे व संगणकीय सोडत या प्रक्रियांनाही मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

========================================================

========================================================