महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे परवडणारी घरे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 19 ऑक्टोबर 2023

महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

ही बातमी वाचा : मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा: नाना पटोले

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित- महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली.  या कंपनीमार्फत विविध शासकीय कामे उदा. परवडणारी घरे आणि शहरी नियोजनअक्षय ऊर्जाकृषीमुल्य साखळीपायाभूत सुविधा प्रकल्पपर्यावरण उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे करण्यास 10 जुलै 2023 मध्ये मान्यता देण्यात आली आहे. 

यालाच अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगलाहजुरी व किसन नगर येथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समुह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

ही बातमी वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता जाणून घ्या !

हा प्रकल्प राबविण्यास त्याच प्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळांकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून 25 कोटी इतक्या रकमेची 3 वर्षात व्याजासह परतफेड करण्याच्या तत्वावर या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

========================================================