सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 15 ऑक्टोबर 2023

सामाजिक न्याय विभागाच्या 91 वा वर्धापन दिन मुंबई विभागात वंदना कोचुरे ,प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

15ऑक्टोबर हा सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो . वर्धापन दिनानिमित्त मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ही बातमी वाचा : तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा -केसरकर

भिवंडी जिल्हा ठाणे येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे यांच्या वतीने शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा जावळी येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड यांच्यावतीने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादि चेआयोजन करण्यात आले होते.

ही बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

रत्नागिरी जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रत्नागिरी यांच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त सामाजिक न्याय भवन येथे ॲट्रॉसिटी ॲक्ट या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना मोफत टॅब चे वाटप करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त विभागात झालेल्या कार्यक्रमात सर्वाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================