दसरा,दिवाळी तसेच छट पुजेनिमित्त मध्य रेल्वेच्या 30 विशेष गाड्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 12 ऑक्टोबर 2023

दसरा, दिवाळी तसेच छट पुजा या सणांमुळे प्रवास करणाऱ्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने 30 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ही बातमी वाचा : स्वच्छतेसाठी शिस्त हवी

1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (20 फेऱ्या)

गाडी क्र. 02139 सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 19 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सोमवार आणि गुरुवारी मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.

गाडी क्र. 02140 सुपरफास्ट स्पेशल 21 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी दुपारी 1.30 वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.10  वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

डब्यांची रचना: 16 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.

ही बातमी वाचा : चंदेरी दुनियेतील तारे : सीमा – रमेश देव

2) नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (10 फेऱ्या)

गाडी क्र. 02144 सुपरफास्ट स्पेशल 19 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सायंकाळी 7.40 वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्र. 02143 सुपरफास्ट स्पेशल 20 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या काळात  दर शुक्रवारी पुणे येथून सायंकाळी 4.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूर येथे पोहोचेल.

थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी.

डब्यांची रचना: 16 तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.

ही बातमी वाचा : ब्रह्मांडातल्या आवाजाचा शोध

तिकीट आरक्षण: या सर्व विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 14 ऑक्टोबर रोजी सर्व प्रवासी आरक्षण केंद्र स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

========================================================