गुरूत्वाकर्षण लहरींचा शोधात भारतातल्या सात संस्थांमधील वैज्ञानिकांचा समावेश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2023
गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील खगोलशास्त्रज्ञ ब्रह्मांडात होत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. खगोलशास्त्रज्ञांच्या एका टिमला गुरूत्वाकर्षण लहरी ऐकण्यामध्ये यश आले आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी हे मोठे यश मानले जात आहे. आनंदाची बाब म्हणजे या शोधामध्ये सात भारतीय खगोलशास्त्रज्ञांचाही समावेश आहे. या लो-पिच लहरी ऐकण्यासाठी जगभरात सहा रेडियो दुर्बिणी वापरण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे इथल्या मेट्रोवेव रेडिओ टेलीस्कोप(यूजीएमआरटी) यांचाही समावेश होता.
या शोध नुकताच अस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाला आहे. जवळपास १९० खगोलशास्त्रज्ञांची टिम गेल्या पंधरा वर्षांपासून यासाठी संशोधन करत आहे. पुण्यामधील मेट्रोवेव रेडिओ टेलीस्कोप(यूजीएमआरटी) चे काम ब्रह्मांडातून मिळणा-या विविध सिग्नल एकत्र करणे आणि त्यांची वारंवारता वाढवणे त्यामुळे गुरूत्वीय लहरींची पुष्टी होवू शकेल याकडे लक्ष दिले जाते.
हा लेख वाचा : नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !
गुरूत्वाकर्षण लहरी या कृष्णविवर एकमेकांवर आदळल्यानंतर तयार होतात. या शोधामुळे शास्त्रज्ञांना कृष्णविवरांबाबतची रहस्य माहिती होण्यासाठी मदत होणार आहे.
एका अभ्यासानुसार या शोधाची सुरूवात 2002 मध्ये करण्यात आली. 2016 मध्ये यामध्ये इंडियन पल्सर टायमिंग अरे सुध्दा जोडले गेले. कमी फ्रिक्वेंसी असणारे गुरूत्वाकर्षण तरंगांचा शोध लावणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या प्रयोगामध्ये पुणे, मुंबई रूडकी, भोपाळ, हैद्राबाद, चेन्नई, बेंगलूरू यांच्यासोबत जपानच्या कुमामोटो विद्यापीठातील शास्त्रज्ञही या शोधात सहभागी झाले होते.
ही बातमी वाचा : आठ हजार वर्षांपूर्वीच्या हवामान आणि पर्यावरणीय बदलांचे रहस्य उलगडले
गुरूत्वाकर्षण लहरींचे प्रसारण सर्वात आधी 1916 साली अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केले होते. आता या लहरी अतिशय कमी मात्रेत लो-पिचमध्ये ऐकल्या जावू शकतात. कृष्णविवरे वेगळी झाल्यानंतर गुरूत्वाकर्ण लहरी तयार होतात. या लहरींच्या शोधामुळे शास्त्रज्ञांना कृष्णविवरांबाबत अधिक माहिती मिळणार आहे.
========================================================
========================================================