विविध कला-क्रीडा स्पर्धांना ज्येष्ठ नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2023

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांच्या अंगभूत कला, क्रीडा गुणांना उत्तेजन देणा-या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जेष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत उत्स्फुर्त आनंद घेत आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.

ही बातमी वाचा : सरकारी कार्यालये ५ दिवस बंद राहणार

विविध 14 कला-क्रीडा प्रकारांत 334 महिला व पुरूष ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत या स्पर्धा यशस्वी केल्या. यामधील पारितोषिकप्राप्त ज्येष्ठांचा सन्मान विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे 1 ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनी संपन्न होणा-या विशेष कार्यक्रमाप्रसंगी गौरव केला जाणार आहे.

ही बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला

या स्पर्धांमध्ये नमुंमपा शाळा क्र. 27, सेक्टर-15, वाशी येथे 25 सप्टेंबरला संपन्न झालेल्या कथाकथन स्पर्धेत 16, हास्य स्पर्धेत 5, वेशभुषा स्पर्धेत 7, वैयक्तिक नृत्य स्पर्धेत 3 व टेलिफोन स्पर्धेत 10 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.

त्याचप्रमाणे 26 सप्टेंबरला त्याच शाळेत संपन्न झालेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत 8, वैयक्तिक गायन स्पर्धेत 37 आणि काव्यवाचन स्पर्धेत 23 ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत आपल्यातील कला साहित्य गुणांचे दर्शन घडविले.

ही बातमी वाचा : आदित्य एल-१ चा सूर्याच्या दिशेने प्रवास सुरू असतानाच माहिती जमा करण्यास सुरूवात

दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी, कै. सिताराम मास्तर उद्यान सेक्टर 7 सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे आयोजित कॅरम स्पर्धेमध्ये 125 पुरूष व 4 महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत तसेच बुध्दीबळ स्पर्धेमध्ये 22 पुरूष व 3 महिला ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होत क्रीडागुणांचे प्रदर्शन केले. याशिवाय ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागा गणा पाटील उदयान, से-15, सीबीडी बेलापूर येथे 27 सप्टेंबरला झालेल्या ब्रीझ गेम स्पर्धेत 40 ज्येष्ठांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

“मी ज्येष्ठ नागरिक बोलतोय….!” याविषयावर आयोजित निबंध स्पर्धेमध्ये 15 तसेच पत्रलेखन स्पर्धेमध्ये कुटूंबातील एका व्यक्तीला पत्र लिहित 16 ज्येष्ठ नागरिकांनी साहित्यगुण दर्शन घडविले.

या सर्व स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणा-या ज्येष्ठ नागरिकांना 1 ऑक्टोबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सन्मानीत केले जाणार असून त्या सोबतच 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत ज्या ज्येष्ठ  नागरिकांच्या  वयाला 75 वर्ष  पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिकांचा तसेच 1 ऑक्टोबर 2022  ते 30  सप्टेंबर 2023पर्यंत ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या विवाहास 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत, अशा ज्येष्ठ नागरिक दांम्पत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हा लेख वाचा : चंदेरी दुनियेतील तारे : सीमा – रमेश देव

========================================================

========================================================