- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 27 सप्टेंबर 2023
अनंत चतुर्दशी निमित्त उद्या, 28 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता उद्या गुरुवारी (28 सप्टेंबर) स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.
ही बातमी वाचा : Navi Mumbai Morbe Dam: जलपूजनाचा वाद चिघळला
याशिवाय ईद निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 सप्टेंबर रोजी (शुक्रवारी) सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे उद्यापासून पुढील पाच दिवस सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार असल्याची माहिती ठाणे विभागीय माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
ही बातमी वाचा : माथाडी कामगार कायद्यात कोणतीही छेडछाड होणार नाही: उपमुख्यमंत्री फडणवीस
- शासकीय कार्यालये 5 दिवस बंद
- 28.9.2023 अनंत चतुर्दशी
- 29.9.2023 ईद-ए-मिलाद
- 30.9.2023 शनिवार
- 1.10.2023 रविवार
- 2.10.2023 महात्मा गांधी जयंती
हा लेख वाचा : नाचणी, बाजरी, ज्वारी खा अन् तंदुरुस्त राहा !
========================================================
========================================================