- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 7 सप्टेंबर 2023
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 सप्टेंबर रोजी याबाबत शासन निर्णय जारी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा निर्णय जारी करून समिती सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे सचिव सुमंत भांगे यांचे पत्रही देण्यात आले.
========================================================
========================================================