भंगार विकून मध्य रेल्वेला मिळाले १५०.८१ कोटी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7 सप्टेंबर 2023

मध्य रेल्वेने “झिरो-स्क्रॅप” मिशन सुरू केले आहे. मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन, कालबाह्य (ओव्हरेज्ड) लोको, डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि जुनाट किंवा अपघाती लोको/कोच यासह विविध प्रकारचे भंगार निवडण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

या मिशनमुळे  मध्य रेल्वेने ३१ ऑगस्ट 2023 पर्यंत १५०.८१ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आहे. रेल्वे बोर्डाच्या प्रो-रेटा उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्ट २०२३ पर्यंत ३७.१०% ची वाढ झाली आहे.

मध्य रेल्वेने गाठलेल्या एप्रिल ते ऑगस्ट-२०२३ या कालावधीतील आनुपातिक विक्री लक्ष्यापेक्षा ही सर्वाधिक टक्केवारी वाढ आहे.

  • खालील विक्रीद्वारे हे साध्य झाले आहे-
  • ६०८६ मेट्रिक टन रूळ,
  • ०९ लोकोमोटिव्ह,
  • १६० कोच, आणि
  • ६१ वॅगन्स (भुसावळ विभागातील १२ किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह)

 

  • मिशन झिरो स्क्रॅपसाठी प्रमुख योगदान – एप्रिल ते ऑगस्ट-२०२३ या कालावधीसाठी रु. १५०.८१ कोटी भंगार विक्री महसूल खालीलप्रमाणे 
  1. माटुंगा डेपोने रु.२७.१२ कोटींची भंगार विक्री गाठली.
  2. मुंबई विभागाने रु. २५.९७ कोटींची भंगार विक्री गाठली
  3. भुसावळ विभागाने २२.२५ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली.
  4. पुणे विभागाने रु.१६.०८ कोटींची भंगार विक्री गाठली.
  5. भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने १६.०५ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली.
  6. सोलापूर विभागाने ११.३६ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आणि
  7. नागपूर विभागाने रु.१०.०७ कोटींची भंगार विक्री गाठली.
  8. मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणांनी एकत्रितपणे २१.९१ कोटी रुपयांची भंगार विक्री गाठली आहे.

========================================================

========================================================