- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 5 सप्टेंबर 2023
इस्रोच्या पहिल्या सौर मोहिमेमधील आदित्य एल 1 या अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्र येथून या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही -सी 57 या ध्रृवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या माध्यमातून आदित्य एल-1 पृथ्वीच्या खालच्या अपेक्षित कक्षेत सोडण्यात आले. उड्डाणाच्या अपेक्षित वेळेनंतर आदित्य एल-1 ने त्यात असलेल्या सौर पंखांच्या सहाय्याने वीज निर्मीती सुरू केली आहे. आदित्य एल 1 चांद्रयान-3 प्रमाणे अंडाकार कक्षेत भ्रमंती करत पुढील प्रवासाच्या दिशेने निघेल. त्याच्या प्रत्येक कक्षेत स्थिरावण्यासाठीच्या प्रक्रियेची पहिली सुरूवात 3 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेल्या एल-1 या लॅंग्रेज पॉईंटवर स्थिर केले जाणार आहे. तिथे पोहोचण्यासाठी या यानाला 125 दिवस लागणार आहेत.
- आदित्य-L1 मोहिमेची वैशिष्ट्य
आदित्य एल 1 मोहिम ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळात असणारी वेधशाळा आधारित भारतीय मोहीम असणार आहे. जानेवारी 2008 मध्ये या मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला होता. आदित्य एल 1 ला 1.5 लाख किमी अंतरावर असणा-या लक्ष्य बिंदू पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
- लँग्रेज पॉइंट म्हणजे काय ?
या बिंदूवरून सूर्य कोणत्याही अडथळ्याविना सलग दृष्टीस पडतो. त्याला लँग्रेज पॉइंट म्हटले जाते. लँग्रेज या शब्दाचा अर्थ इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लोईक लॅंग्रेज यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. त्यांनी 1972 साली आपल्या तंत्रज्ञानाच्या आधारे हा बिंदू आपल्या जर्नल थ्री बॉडी पॉब्लेममध्ये वर्णन केले आहे. मात्र त्याआधीसुध्दा एल- 1, एल- 2, एल-3 हे तीन बिंदू शोधण्याचे श्रेय स्वीस गणितज्ञ लेनॉर्ड आयलॉर्ड यांना दिले जाते. एल-1 या बिंदूवर नासाने याआधीही सौर वेधशाळा सोहो पाठवली आहे. तसेच जगप्रसिध्द जेम्स वेब खगोलिय दुर्बिण एल-2 या बिंदूवर स्थापित केली आहे. एल- 1 या बिंदूची पृथ्वीपासूनचे अंतर 15 लाख किलोमीटर आहे. पृथ्वीपासून सूर्यापर्यंतचे हे अंतर केवळ एक टक्के आहे. असे पाच लॅंग्रेज पॉईंट शोधण्यात आले आहेत. या सर्व बिंदूवर उपग्रह आपले संशोधनाचे काम पूर्ण करू शकते. या बिंदूवर सूर्य कोणत्याही ग्रहणाच्या अडथळ्याशिवाय कायमच दिसत राहणार आहे. तसेच कोणत्याही निरिक्षण, मापके आणि विश्लेषण यांसाठी इथे कोणताही अडथळा येणार नाही. याच बिंदूवर उपग्रह स्थिर करण्याचे महत्वाचे कारण हेच आहे की या बिंदूवर कोणताही वायू नाही इथे कमीत कमी इंधन वापरून उपग्रह वेधशाळा आपले काम करू शकते.
या बिंदूवर सूर्य किंवा पृथ्वीची गुरुत्वाकर्षणशक्ती काम करत नाही. या बिंदूच्या चारही बाजूंनी होलो ऑर्बिट (प्रभामंडळ कक्षा) असून इथे कोणताही ग्रह स्थिर राहू शकतो. पृथ्वीवरून प्रक्षेपण केल्यानंतर आदित्य-एल1 अंतराळ वेधशाळा सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट-1 भोवती प्रभामंडळ कक्षेत आणली जाईल. आदित्य एल -1 हे 125 दिवसात या लँग्रेज पॉइंटवर पोहोचेल. त्या बिंदूवर पोहोचल्याने ही वेधशाळा नेहमी सूर्यावर लक्ष ठेवेल.
आदित्य-L1 मोहिमेमध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सात वैज्ञानिक पेलोड्स आहेत जे सूर्याच्या बाहेरील आवरणाचा अभ्यास करतील. आदित्य एल-1 मोहिमेचे कार्य सौर क्रियाकलाप आणि अवकाशातील हवामान शोधणे हे असेल. हा डेटा इस्रोकडे पाठवला जाईल, ज्यामुळे सूर्यामुळे पृथ्वी संकटात आहे की नाही, याचे आकलन करणे सोपे होईल. आदित्य एल- 1 मोहीम सूर्याचा अभ्यास करून तिथे होणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी पाठविले जात आहे. सूर्यावरील घडामोडींचा पृथ्वी आणि इतर ग्रहांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला जाणार आहे. आदित्य एल-1 सूर्याच्या फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर, सूर्याभोवतीच्या कोरोनावर नजर ठेवेल. तसेच आजूबाजूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक कणांचा आणि चुंबकीय क्षेत्र अभ्यास करणार आहे.
========================================================