मी पोहोचलो…

चांद्रयान- 3  च्या यशस्वी लॅंडिगनंतर चांद्रयानाचा पृथ्वीला मेसेज

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

23  ऑगस्ट 2023 :

गेले महिनाभर संपूर्ण भारतीय ज्या क्षणाची वाट पाहात होते तो क्षण अखेर आज प्रत्यक्षात साकार झाला आहे. भारताची अतिशय महत्वांकाक्षी असलेली चांद्रयान-3 ही मोहिम यशस्वी झाली आहे. आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 ने आपल्या सुनिश्चित जागी उतरून आपले सॉफ्ट लॅंडिंग यशस्वी केले. या सोबतच भारत चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरणारा जगातला पहिला देश ठरला आहे. चांद्रयान मोहिम यशस्वी झाल्यानंतर चांद्रयान-3 ने मी माझ्या जागी पोहोचलो आणि तुम्हीसुध्दा असा मेसेज पाठवला आहे.

चांद्रयान -3 (chandrayaan-3) चा लॅण्डर मॉड्यूल चंद्रावर उतरवण्यासाठी सुरक्षित क्षेत्र शोधण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे यशस्वी लॅंडिंग करण्यात आले. त्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी टाळ्या वाजवत आपला आनंद व्यक्त केला.

चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लॅंडींग केल्यानंतर आता चंद्रावर रोव्हर रोविंग आणि तिथे स्थापित होऊन वैज्ञानिक प्रयोग करणे हि चांद्रयान 3 ची पुढील उद्दिष्टे राहणार आहेत.

चांद्रयान -3 (chandrayaan-3) मोहिमेसाठी 14 जुलै रोजी 2023 आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोट्टा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.

====================================================