अविरत वाटचाल च्या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे त्वरीत निर्देश
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 24 जुलै 2023
नवी मुंबईतील प्रसिद्ध अशा ज्वेल ऑफ नवी मुंबई या उद्यानाच्या दुरवस्थेबाबत अविरत वाटचालने केलेल्या वृत्ताची त्वरीत दखल घेत साफसफाईचे काम सुरू करण्यात आले आहे.
ज्वेल ऑफ नवी मुंबईची झाली घसरगुंडी या मथळ्याखाली काही वेळापूर्वी अविरत वाटचाल न्यूज नेटवर्कने बातमी प्रसिद्ध केली होती. या वृत्ताची दखल घेत नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तातडीने संबंधित विभागाला निर्देश दिले. त्यानंतर त्वरीत साफसफाई तसेच ब्लिचिंग पावडर टाकून शेवाळे काढून टाकण्यात आले आहे. ज्वेल च्या परिसरात ब्लिचिंग पावडर टाकून गुळगुळीत झालेला भाग कोरडा केला जात आहे. तसंच अस्ताव्यस्त पसरलेली मातीही भरून टाकण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने फेरफटका मारायला येत असतात. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर नागरी समस्यांकडे बारकाईने लक्ष ठेवून तातडीने समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची पावले उचलत असून ही बाब स्वागतार्ह आहे. याबाबत त्यांचे आभार. महापालिकेने सुरू केलेल्या या सफाई कामामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांना उद्यानात निर्धास्तपणे फेरफटका मारता येईल.
अमित मढवी
समाजसेवक, नेरुळ- सीवूड
========================================================
========================================================