- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- इर्शाळगड, 20 जुलै 2023
रायगड जिल्हातल्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे काल रात्री 11.30 च्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड गावावर कोसळली. या दुर्घटनेत दरड कोसळल्याने आदिवासीवाडीतील घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याची प्राथमिक माहिती रात्री 11.35 वाजताच्या सुमारास प्राप्त झालेली असून प्राथमिक माहितीनुसार 10 जण दगावल्याचे वृत्त आहे. तर लहान मुलांसह अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसह दुर्घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेमार्फत सर्व बचाव पथकांना तात्काळ पाचारण करण्यात आले. परंतु दुर्गम भाग व मुसळधार पाऊस यामुळे रात्री 12.40 च्या सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळी बचाव पथकासह पोहचली असून, तात्काळ बचाव कार्यास यशवंती हाइकर्स स्वयंसेवी संस्थेचे 25 स्वयंसेवक, 30 चौक ग्रामस्थ, वरोसे ग्रामस्थ 20, नगरपालिका खोपोली यांचेकडील 25 कर्मचारी, चौक ग्रा. पं. कडील 15 कर्मचारी, निसर्ग ग्रुप पनवेल यांचेकडील 15 स्वयंसेवक तसेच कोलाड रिव्हर राफटर्स इत्यादींच सहभाग आहे. इरशाल गडाच्या पायथ्याशी वैद्यकीय पथके, अॅम्बुलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.
🕚11am | 20-07-2023📍Vidhan Bhavan, Mumbai | स. ११ वा | २०-०७-२०२३📍विधानभवन, मुंबई.
LIVE | रायगड जिल्ह्यातील खालापूरनजिक इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेसंदर्भात विधानसभेत निवेदन. #Raigad #maharashtra
(Deffered Live) https://t.co/eeONzz4AxW— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 20, 2023
सदर वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरावरती इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या आदिवासी वाडीमध्ये एकूण 48 कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या 228 इतकी आहे.
इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. खालापूर तालुक्यामध्ये 17 जुलै ते 19 जुलै या 3 दिवसामध्ये एकूण 499 मिमि पावसाची नोंद झालेली आहे. सदर ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे जागते. सध्या घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. तथापिक NDRF पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य युध्द पातळीवर सुरु आहे.
या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
- इर्शाळवाडी दुर्घटनेची भिषणता दर्शविणारी छायाचित्रे
- मदतकार्यादरम्यान नवी मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू
बेलापूर अग्निशमन दलातील जवान सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दरड कोसळलेल्या ठिकाणी मदतकार्य करताना दुःखद मृत्यू झाला.
========================================================
========================================================