आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरवणे गावात योगा प्रशिक्षण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 जून 2023

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिरवणे गाव नेरुळ येथे माजी नगरसेविका माधुरी सुतार यांच्यावतीने एक दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नियमित योगा करणे निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगत आजच्या धावपळीच्या जगात महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात योगाला स्थान द्यावे, असे आवाहन माधुरी सुतार यांनी केले.

याप्रसंगी सर्वांनी योग साधना केली व एकमेकांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या बलवान बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी प्रशिक्षिका सौ रुपाली संदीप पाटील यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र