युवाप्रेरणा सामाजिक संस्था व खारघर स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे योग शिबिराचे आयोजन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २१ जून २०२३

युवाप्रेरणा सामाजिक संस्था व खारघर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यावतीने खारघर मध्ये दोन ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


जागतिक योगदिनाचे औचित्य साधत योग शिक्षक विवेक सेवाव्रती यांच्यावतीने सेक्टर 19 सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशनच्या खाली योग शिबिर घेण्यात आले होते .सदर ठिकाणी पन्नास हुन अधिक नागरिकांनी योगासने केली.


सेक्टर 14 रघुनाथ विहार या सोसायटीत राधाजीवन दास यांनी रघुनाथ विहार मधील सोसायटीतील रहिवाशांना योगाचे महत्त्व सांगत प्राणायाम व योगाचे धडे दिले.

सदर शिबिरांचे आयोजन  नगरसेविका नेत्रा किरण पाटील व युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते.

========================================================

अविरत वाटचाल  YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र