कास्प ‘या संस्थेतर्फे कवी पुंडलिक म्हात्रे यांचा भव्य सत्कार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उलवे, 18 जून 2023

‘आगरी कवितांचे बादशाह ‘म्हणून ओळखले जाणारे व प्रकल्पग्रस्तांच्या आंदो लनांत आपल्या कवितांनी जागृती करणारे उलवे -पनवेल येथील ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांचा ‘ कास्प ‘(कौन्सिल फॉर आर्ट्स अँड सोशल प्रॅक्टिस )या कला व सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन भव्य सत्कार करण्यात आला.या सत्कार सोहळ्याचे आयोजन उलवे -नोड,सेक्टर २४ येथील श्री हनुमान मंदिर येथे करण्यांत आले होते.
२७ एप्रिल २०२३ रोजी धारावी – मुंबई स्थित महावीर जोशी विद्यालय येथून ‘कास्प ‘या संस्थेतर्फे पुंडलिक म्हात्रे यांच्या आगरी बोलीतील कविता प्रसारित करण्यांत आल्या होत्या व त्याचे प्रसारण मुंबई बरोबरच इथिओपिया येथील अडिस अबाबा,डेन्मार्कच्या कोपनहेगन , रवांडातील किगाळी,आफ्रिकेतील जोहान्सबर्ग अशा जगभरातल्या शहरांत देखील करण्यांत आले होते.

हा कार्यक्रम जगभरात प्रसारित करण्यासाठी ज्यांनी मोलाची भूमिका बजावली त्या ‘ कास्प ‘ च्या डायरेक्टर अमृता गुप्ता, प्राध्यापक आणि कलावंत शर्मिला सामंत व निखिल पुरोहित हे सर्व जण यां वेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आ.सा. वि. मं.चे संस्थापक अध्यक्ष मोहन भोईर यांनी भूषविले.या वेळी व्यासपीठावर कृ. उ. बा.समिती,मुंबई चे संचालक भाई राजेंद्र पाटील,उद्योगपती विजय शिरढोणकर,,ज्येष्ठ साहित्यिक प्रा.चंद्रकांत मढवी, अँड.मनोज म्हात्रे, डॉ. राजेंद्र राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.या सर्व मान्यवरांच्या आदर सत्कारानंतर त्यांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तर मो.का.मढवी गुरुजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या वेळी ज्येष्ठ नागरिक संघटना उलवे नोड,मशाल सामाजिक संघटना उरण -पनवेल, लायन्स क्लब ऑफ उलवे नोड,उरणच्या साहित्यिकांतर्फे ज्येष्ठ कवी राजेंद्र नाईक यांनी व इतर मान्यवरांनी श्री. व सौ.पुंडलिक म्हात्रे यांचा यथोचित सत्कार केला.

या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन द. म.कोळी यांनी केले तर राजेंद्र नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास तरघर गावचे माजी सरपंच रुपेश मोहिते तसेच सुजीत मोकल,कृ. उ.बा.समिती पनवेल चे संचालक रुपेश पाटील,अँड.प्रशांत भोईर,ज्येष्ठ कवयित्री दमयंती भोईर,साहित्यिक श्रीकांत पाटील, अरुण द.म्हात्रे, बी. डी. घरत आदि अनेक साहित्यिक,पुंडलिक म्हात्रे यांचे कुटुंबीय व आप्तेष्ट,उलवे व आजूबाजूच्या गावांतील बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र