- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 16 मे 2023
कळवा वाहतूक उप विभागाचे हद्दीत विटावा जकात नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (कळवा नाका) तसेच स्वागत हॉटेल ते बुधाजी नगर चौक ते घड्याळ चौक ते राणा टॉवर ते कळवा स्टेशन, कावेरी सेतू तसेच कळवा नाका ते पारसिक सर्कल तसेच मनिषा नगर परिसर दरम्यान मोठ्या प्रमाणात शाळा, विद्यालये तसेच सरकारी कार्यालये असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असते. रस्त्याच्या कडेला दुचाकी, चार चाकी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी करण्यात येत असल्याने इतर वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. सदर परिसरात वाहतूक कोंडी होवू नये, वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी खालील ठिकाणी नो पार्किंग, सम विषम पार्किंग (पी-1 व पी-2), समांतर पार्किंग व्यवस्था प्रायोगिक तत्वावर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
नो पार्किंग, समांतर पार्किंग, पी 1, पी २ पार्किंग व्यवस्था करण्यात आलेले ठिकाण
पार्किंग व्यवस्था :- 1. विटावा जकात नाका ते एस. टी. बस आगार (बेलापूर-ठाणे रोडवर)१३०० मि. नो पार्किंग.
तसेच कळवा नाका ते विटावा जकात नाका (ठाणे-बेलापूर रोडवर) १५०० मि. पार्किंग व्यवस्था नो पार्किंग २४ तास.
2) श्रिनिका हॉस्पिटल ते स्वागत हॉटेल 200 मि. नो पार्किंग 24 तास.
तसेच स्वागत हॉटेल ते श्रिनिका हॉस्पिटल 200 मि. समांतर पार्किंग वेळ – 21.00 ते 06.00 वा.
3) निहार सोसायटी ते शंकर मंदिर चौक 200 मि. नो पार्किंग.
तसेच शंकर मंदीर चौक ते निहार सोसायटी 200 मि. नो पार्किंग 24 तास.
4) कळवा नाका ते कावेरी सेतू कट 1000 मि. नो पार्किंग.
तसेच कावेरी सेतू कट ते कळवा नाका 1000 मि. नो पार्किंग 24 तास.
5) 60 फिट रोड कट (स्वामी समर्थ मठ) ते मॅपल बिल्डिंग 500 मि. नो पार्किंग.
मॅपल बिर्डिंग ते 60फिट रोड कट (स्वामी समर्थ मठ) 500 मि. नो पार्किंग 24 तास.
6) 60 फिट रोड कट (स्वामी समर्थ मठ) ते पारसिक सर्कल 2400 मि. नो पार्किंग.
पारसिक सर्कल ते 60 फिट रोड कट (स्वामी समर्थ मठ) 2400 मि. नो पार्किंग 24 तास.
7) सहकार विद्यालय ते कळवा स्टेशन (स्टेशन पार्किंग वगळून) 900 मि. नो पार्किंग.
कळवा स्टेशन (स्टेशन पार्किंग वगळून) ते सहकार विद्यालय 900 मि. नो पार्किंग 24 तास.
8) कळवा स्टेशन ते अल्बा टायपिंग सेंटर 300 मि. नो पार्किंग.
अल्बा टायपिंग सेटर ते कळवा स्टेशन 300 मि. नो पार्किंग 24 तास.
9) राणा टॉवर ते घड्याळ चौक 300 मि. नो पार्किंग.
घड्याळ चौक ते राणा टॉवर 300 मि. नो पार्किंग 24 तास.
10) घड्याळ चौक ते कळवा मेडीकल ते कळवा सुपर मार्केट ते कळवा नाका 300 मि. नो पार्किंग.
कळवा नाका ते कळवा सुपर मार्केट ते कळवा मेडीकल ते घड्याळ चौक 300 मि. नो पार्किंग 24 तास.
11) मनिषा नगर गेट नं.01 ते कळवा प्राथमिक आरोग्य केंद्र 350 मि. नो पार्किंग.
कळवा प्राथमिक आरोग्य केंद्र ते मनिषा नगर गेट नं.01, 350 मि. नो पार्किंग 24 तास.
12) जी.पी. पारसिक बँक कट ते मनिषा नगर गेट नं.03, 150 मि. नो पार्किंग.
मनिषा नगर गेट नं. 03 ते जी.पी. पारसिक बँक कट 150 मि. नो पार्किंग 24 तास.
13) कळवा सुपर मार्केट ते ठाकूर चौक 200 मि. नो पार्किंग.
ठाकूर चौक ते कळवा सुपर मार्केट 200 मि. नो पार्किंग 24 तास.
14) कळवा मेडीकल ते गावदेवी मच्छी मार्केट ते कावेरी सेतू 900 मि. नो पार्किंग.
कावेरी सेतू ते गावदेवी मच्छी मार्केट ते कळवा मेडीकल 900 मि. नो पार्किंग 24 तास.
15) खारेगाव नाका ते पारसिक बँक (खारेगाव रोड) 150 मि. नो पार्किंग.
पारसिक बँक (खारेगाव रोड)ते खारेगाव नाका 150 मि. नो पार्किंग 24 तास.
16) सहकार विद्यालय कट ते बिंदुमाधव पर्यंत 200 मि. नो पार्किंग.
बिंदुमाधव कट ते सहकार विद्यालय कट 200 मि. नो पार्किंग 24 तास.
17) ओमकार अपार्टमेंट ते पंचरत्न सोसायटी ते खारेगाव कट 500 मि. समांतर पार्किंग.
खारेगाव कट ते पंचरत्न सोसायटी ते ओंकार अपार्टमेंट 500 मि. समांतर पार्किंग 21.00 ते 06.00.
18) श्रीनिका हॉस्पिटल ते घडयाळ चौक 250 मि. समांतर पार्किंग 21.00 ते 06.00.
घड्याळ चौक ते प्रभाग समिती पर्यंत 100 मि. समांतर पार्किंग (सरकारी वाहनांकरीता) 10.00 ते 17.00.
19) बुधाजी नगर कमान ते निहार सोसायटी कट 200 मि. पी.1, पी.2 समांतर पार्किंग 24 तास.
20) राणा टॉवर ते अल्बा टायपिंग सेटर 250 मि. पी.1, पी.2 समांतर पार्किंग 24 तास.
21) मनिषानगर गेट नं. 03 ते श्री कृपा बिल्डर ऑफिस कट 400 मि. पी.1, पी.2 समांतर पार्किंग 24 तास.
22) डॉमिनोज पिझ्झा उतरणी ते केशव पार्क बिल्डिंग 100 मि. पी.1, पी.2 समांतर पार्किंग 24 तास.
23) मॅपल बिल्डिंग ते पारसिक बँक रोड 100 मि. पी.1, पी.2 समांतर पार्किंग 24 तास.
हे बदल अधिसुचना प्रसिध्द झाल्या तारखेपासून 15 दिवस प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येत आहे. काही हरकत अगर सुचना असल्यास त्या लेखी स्वरुपात पोलीस उप आयुक्त शहर वाहतूक शाखा कार्यालय तीन हात नाका एल. बी. एस. मार्ग, ठाणे येथे पाठवाव्यात. याबाबत कोणाच्या काही हरकत अथवा आक्षेप प्राप्त न झाल्यास ही अधिसूचना पुढील आदेश होईपर्यंत कायम स्वरुपात अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.
========================================================
-
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र