गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासासाठी जगातली तिसरी वेधशाळा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 14 मे 2023
कृष्णविवर आणि न्यूट्रॉनतारे यासारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी यांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी लिगो इंडिया हे संशोधन प्रयोगशाळा सुरू होणार आहे. जागतिक पातळीवरील गुरुत्वीय लहरींच्या अभ्यासाची तिस-या क्रमांकाची आणि भारतातील पहिलीच वेधशाळा केंद्र हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यात लवकरच सुरू होणार आहे. या वेधशाळेमुळे भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान क्षमतेला मोठे बळ मिळणार आहे.
या केंद्रासाठी औंढा तालुक्यातील खाजगी, सरकारी आणि वन विभागाची अशी 173 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. या केंद्रासाठी एकूण 1300 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लिगो इंडिया चा पायाभरणी सोहळा पार पडला आहे.
जगातील गुरुत्वीय लहरी वेधशाळांपैकी ते एक असेल. हे 4 किमी लांबीचे अत्यंत संवेदनशील इंटरफेरोमीटर असून कृष्णविवर आणि न्यूट्रॉन तारे यांसारख्या प्रचंड खगोल भौतिक वस्तूंच्या विलीनीकरणादरम्यान निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरी समजून घेण्यास सक्षम आहे. अमेरिकेत हॅनफोर्ड, वॉशिंग्टन येथील एक आणि लिव्हिंग्स्टन, लुईझियाना येथील एक अशा दोन वेधशाळांबरोबर लिगो इंडिया समन्वयाने काम करणार आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र