- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 4 मे 2023
उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम दरम्यान 26 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेने याआधीच ९१६ उन्हाळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे आणि या अतिरिक्त उन्हाळी विशेषसह या वर्षी एकूण उन्हाळी स्पेशलची संख्या ९४२ होईल. २६ विशेषचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
01129 विशेष ६ मे ते 3 जूनपर्यंत दर शनिवार, सोमवार आणि बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 10.15 ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता थिविमला पोहोचेल.
01130 विशेष 7 मे ते 4 जूनपर्यंत दर रविवार, मंगळवार आणि गुरुवारी थिविम येथून 4.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५ वाजता पोहोचेल.
थांबे:
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.
डब्यांची संरचना:
एक प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय, १० शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण:
विशेष गाडी क्रमांक 01129/01130 साठी विशेष शुल्कासह बुकिंग 4 मेपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सूरु होईल.
तपशीलवार वेळ आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र