ठाणे शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 4 मे 2023

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के- व्हीला नाला येथील पुल प्रकल्पाच्या कामात 500 मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधीत होत  आहे.  सदर बाधित  जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम सुरु असल्यामुळे शनिवार , 6 मे रोजी सदर इनलेट जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करणेचे काम हाती घेतल्याने सकाळी 9 ते सायंकाळी 9 वा पर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

या  शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत उथळसर प्रभाग समिती मधील जेल जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी 1, राबोडी 2, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसर इ. भागांचा पाणी पुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र