- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, २९ एप्रिल २०२३
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ मधील १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधित गुटखा, सिगारेटविरोधात धडक कारवाई करून १४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बंदी असलेल्या गुटखा,सिगारेटची बेकायदेशीरपणे विक्री विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आणि सिगारेट विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त संजय मोहीते यांच्या आदेशानुसार आणि परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १७ एप्रिल ते २७ एप्रिल या दहा दिवसांत विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवून COPTA कायद्याअंतर्गत १४७ धडक कारवाई करण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा तसेच सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला. तसेच १४७ जणांविरोधात कारवाई करण्यात आली.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र