ठाणे शहरास पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली;

मुख्य जलवाहिनी फुटल्याने मंगळवार सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद

  • अविरत वाटचाल  न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 17 एप्रिल 2023

ठाणे शहरास पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मुंबई-नाशिक महामार्गालगत माणकोली पेट्रोलपंपाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजता फुटली. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा बंद झाला आहे.

महापालिकेच्या जल विभागातर्फे या जल वाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या दुरुस्तीमुळे मंगळवार, सकाळी  ९ वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच, बुधवारपर्यंत पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र